नागपुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद

0
नागपूर / नागपुरात या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची आज नोंद झालीय. नागपूरचा पारा 46.2 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचलाय.
उष्णतेची लाट काही दिवस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलीय. त्यामुळं नागपूरकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली असली तरी उन्हाची काहिली कायम आहे.

त्यात नागपुरात विक्रमी तापमानाची नोंद झाल्यामुळं नागपूरच्या उकाड्यात आणखीनच भर पडली आहे.

LEAVE A REPLY

*