विचारांनी ‘मॉडर्न’ होण्याचा प्रयत्न करा : युवा सवांद यात्रेत खा.सुप्रिया सुळे यांचे तरुणाईला आवाहन

0

पारोळा, | प्रतिनिधी :  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍या निम्मित पारोळा येथे घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आयोजित जागर हा जाणिवांचा, युवा सवांद यात्रा कार्यक्रमास तरुण व तरुणींनी भरभरून प्रतिसाद दिल्याने खा. सुळे यांनी त्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिलीत.

किसान महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाध्यक्ष आ.डॉ सतीश पाटील, माजी खा.ऍड. वसंतराव मोरे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आ.दिलीप वाघ, ऍड. रवींद्रभैय्या पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, जि.प.सदस्य रोहन पवार , विजया पाटील, प्रा वाय.व्ही.पाटील, प्रा जी.एच सोनवणे, पं.समिती सभापती सुंनदा पाटील, प्रसिद्धी प्रमुख प्रा.अविनाश आहिरे, पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते जि.प., पं.स. सदस्य नगरसेवक व मोठ्या संख्येत विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

प्रस्तावनेत आ.डॉ.सतीश पाटील यांनी यात्रे बाबत सांगितले, की खुला सवांद साधण्यासाठी खा सुप्रिया सुळे ह्या राज्यभर दौरे करीत आहेत, यात तरुणांचे प्रश्न केंद्र व राज्यात मांडले जावे हा मूळ हेतू असल्याचे स्पष्ट केले.

खा सुळे यांनी व्यासपीठ सांभाळीत सरळ तरुण व तरुणींशी सवांद साधित आपले प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. यावेळी अश्विनी पाटील ह्या किसान महाविद्यालयाच्या तरुणीने स्री भृण हत्या विषयवार आपले मत मांडीत ठोस कायद्याबाबत आवाहन केले तर निलेश नाना पाटील ह्या तरुणाने शेतकरी आत्महत्या व कर्जमाङ्गी बाबत ठोस भूमिका घेणे, शेती मालाला हमी भाव मिळवून देणे, शेतकर्‍यास स्वावलंबी करणे, याबाबत मत मांडताना शेतकर्‍यांबाबत समाजाची भूमिका बदलणे गरजेचे सांगून शेतकरी वाचला तरच देश वाचेल शेतकर्‍याच्या मुलाशी लग्न करण्यासाठी कोणी तयार होत नाही असा दावा केला

तर वृषाली पाटील हिने हुंडाबळी विषयवार आपले मत मांडताना समाजाने मानसिकता बदलवण्याची गरज बोलून दाखवली व मुलींना आरक्षणासोबत संरक्षणाची गरज बोलून दाखवली यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना खा.सुळे यांनी दिलखुलास उत्तरे देवून व त्यांच्यात रमून मनमोकळी चर्चा केल्याने कार्यक्रमास रंगत आली होती.

यावेळी मुलींची छेड काढली जाते का? या विषयावर त्यांनी सरळ प्रश्न विचारला असता त्या बाबत मुलांनी मुलींवर तर मुलींनी मुलांवर आरोप केले यात कोणी ड्रेसबाबत तर कोणी सोशल मिडियाला दोष दिला परंतु खा सुळे यांनी स्पष्ट केले, कि विचारांनी मॉडनर्र् होण्याचा प्रयत्न करा, मुलींनी सेल्ङ्ग डिङ्गेन्स वाढवावा, असे सांगितले.

यावेळी काही तरुणींनी ग्रामीण भागात बसेसच्या समस्या मांडल्या तर काहींनी १० वी नंतर हि विद्यार्थिनी यांना ङ्गी माङ्ग मिळावी, अशी मागणी केली.

विद्यार्थिनींचा  अश्रू बांध

यावेळी प्रश्न उत्तरे सुरु असताना व्यासपीठावर वेल्हाणे येथील वर्षा संतोष पाटील ह्या विद्यार्थिनीने आपल्या व्यथा मांडताना आईची तब्येत बरी नसल्याने वडिलांना शेतात मदत करून शिक्षण घ्यावे लागत असताना मात्र गावावरून बसेस मिळत नसल्याने हाल होत असल्याचे सांगताना तिने खा. सुळे यांना गळा भेट देत ढसाढसा आश्रू गाळल्याने पूर्ण व्यासपीठ स्तब्ध झाले होते.

यावेळी खा सुळे यांनी वसतिगृहात शिक्षण घेणार का? असे सांगितले परंतु वडिलांना मदत करावी लागते, असे संागत ङ्गक्त बसची व्यवस्था करून द्या, अशी मागणी केली या बाबत त्वरित कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. या नंतर खा. सुळे यांनी किसान महाविद्यालयाच्या माती व पाणी परीक्षण प्रयोग शाळेचे उद्घाटन केले यावेळी ह्या विभागाच्या प्रा अनिरुद्ध मोहन देवरे यांनी शेतकर्‍यांना मोङ्गत माती व पाणी परीक्षण करून देत असल्याची माहिती दिली तसेच बेटी बचावो बेटी पढावो लोगोचे व संगणक कक्षाचे उदघाटन केले.

सूत्रसंचालन प्रा. माणिक बागले तर आभार जिल्हाध्यक्ष आ.डॉ.सतीश पाटील यांनी मानले. कार्यक्रम तीन तास चालला.

LEAVE A REPLY

*