अवघ्या २३ महिन्यात चंदेल यांची बदली : खुर्चीमागील (राज)कारण काय?

0
जयेश शिरसाळे | जळगाव  :  पोलिस दलात हेवी पोस्टींग मानल्या जाणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची मिळविण्यासाठी वजन वापरावे लागत असते. २३ महिन्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेची खुर्ची पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी सांभाळली.

मात्र पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी अचानक ‘धक्कातंत्र’चा वापर केला आणि पोलिस निरीक्षक चंदेल यांची उचलबांगडी करून त्यांना साईड पोस्टला टाकले.

एलसीबीची खुर्ची हलण्यामागील (राज) कारण काय? याचे कारण गुलदस्त्यात असले तरी पोलिस प्रशासनात तर्कवितर्क काढून चर्चा रंगू लागली आहे.

पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी अचानक दि.११ रोजी रात्री पोलिस दलातील काही महत्वाच्या प्रशासकीय बदल्या केल्या. तसा तो त्यांचा प्रशासकीय अधिकारही आहे. पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी डिसेंबर २०१५ मध्ये पदभार घेतला हेाता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदाचा कार्यकाळ तीन वर्षासाठी असतो. परंतू २३ महिन्यांत पोनि. राजेशसिंह चंदेल यांची बदली करून थेट त्यांना साईड पोस्ट देण्यात आली. दरम्यान चंदेल यांना मानव संसाधन विभागाची साईड पोस्ट देण्यामागील भूमिका मात्र गुलदस्तात आहे.

पोलिस अधिक्षक यांनी अचानक केलेल्या खांदेपालटमध्ये पोनि चंदेल यांच्या जागी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेचे धुरा सोपविण्यात आली आहे. तर क्राईम रेषो अधिक असलेल्या एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या निरीक्षकपदी रामानंद नगर पोलिस स्टेशनचे बापु रोहम यांना नियुक्त करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक चंदेल यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांना साईड पोस्टला का टाकण्यात आले यामागील कारण काय? तसेच एलसीबीची खुर्ची अचानक हलण्यामागील (राज) कारण काय?असे नानविध प्रश्‍न उपस्थित होत असून पोलिस प्रशासनातच तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

LEAVE A REPLY

*