शासनाला 47 कोटी देण्यास मनपाचा नकार

0

जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-घरकुलसह विविध 21 योजनांसाठी तत्कालीन जळगाव नगरपालिकेने हुडकोकडून 141 कोटी 34 लाखाचे कर्ज घेतले आहे.

त्यासाठी शासनाने हमी घेतली असून हमीपोटी 47 कोटी 45 लाखाची रक्कम अदा करावी, असे शासनाने मनपाला पत्राद्वारे कळविले आहे.

परंतु मनपाची आर्थिकस्थिती बिकट असल्यामुळे रक्कम माफ करावी, अशा आशयाचे पत्र प्रभारी आयुक्तांनी नगरविकास विभागाला दिल्या आहेत.

तत्कालीन नगरपालिकेने हुडकोकडून घेतलेल्या कर्जापोटी दरमहा 3 कोटी तर जेडीसीसीकडून घेतलेल्या कर्जापोटी 1 कोटी असे दरमहा 4 कोटी अदा करावे लागत आहे.

त्यामुळे महापालिकेची आर्थिकस्थिती बिकट झाली आहे. मनपाने एक रकमी कर्जफेडीचा प्रस्ताव हुडकोला दिला आहे. परंतु मनपाचा प्रस्ताव हुडकोने नाकारला आहे.

तसेच डीआरटीने 340 कोटीची डिक्री नोटीस देखील मनपाला बजावली आहे. हुडकोचे कर्ज घेतांना शासनाने मनपाची हमी घेतली आहे.

हमीपोटी 47 कोटी 45 लाखाची रक्कम अदा करावी, असे शासनाने मनपाला पत्राद्वारे कळविले आहे. परंतु आर्थिक बिकट असल्याने हमी शुल्काची रक्कम भरणे शक्य नाही.

थकीत रक्कमेवर कुठलीही व्याज व दंड लावू नये, तसेच पूर्णपणे शुल्क माफ करण्याबाबत प्रभारी आयुक्तांनी नगरविकास विभागाला पत्राद्वारे कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

*