सातबारा कोरा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – खा.सुळे

0

जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-राज्यात शेतकरी वर्गाला न्याय देण्याकरीता सरकार सक्षम नसुन हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे.

चावडी वाचन करा किंवा शेतकरी संदर्भात नविन धोरण काढा, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय राष्ट्रवादी पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार बोलतांना दिला.

राष्ट्रवादीचे जिल्हा बँक संचालक अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परीषदेत खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, डिजीटल प्रणाली होणे गरजे आहे.

परंतु किती लोकांचा फायदा या प्रणाली मुळे होत आहे. आधार लिंकीगसह इतर योजना सरकारच्या निकामी ठरल्या आहेत. राज्यात कुपोषण, अंगणवाडी विषय, भारनियमन, वृध्द नागरिक, आत्महत्या, कर्जमाफी, नौकरी,पेशन, पगार, एसटी, अशा विविध समस्या राज्याला भेडसावत आहे.

कोपर्डीप्रकरणी नव्या वर्षापासुन आंदोलन
फडणवीस सरकार शेतकर्यांचे हाल करित आहे. सामान्य नागरीकांचे आश्वासनाची पुर्तता करु शकत नाही लोंकाचे प्रश्र सोडवू शकत नसाल तर सत्ता सोडा असेही खा. सुळे म्हणाल्यात. एक वर्षाचा कालावधी उलटून देखिल कोपर्डी घटने संदर्भात मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे 1 जानेवारीपासुन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.

 

LEAVE A REPLY

*