’समझने वालों को इशारा काफी है’ खोत यांचा राजू शेट्टींना टोला

0
रत्नागिरी / स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद काही मिटताना दिसत नाही. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत दोन्ही नेत्यांमधील वाद चिघळत आहे.
एका कार्यक्रमात राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांना बागलबच्चे म्हणाले होते. याला सदाभाऊ खोत यांनी रत्नागिरी येथील कार्यक्रमात उत्तर दिले आहे.
’समझने वालो को इशारा काफी है’, असे म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्या बागलबच्चे प्रस्थापितांच्या पक्षात असतात, या वक्तव्याचा समाचार घतला.
राजू शेट्टी

 

ते रत्नागिरीच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेत सहभागी होण्यासाठी अट घालत.

सदाभाऊ बदलले आहेत. हा निसर्गाचा नियम आहे, असा टोला शेट्टी यांनी लगावला होता. त्यानंतर त्यांनी एका माध्यमांच्या कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांना बागलबच्चे म्हणाले होते.

बागलबच्चे या वक्तव्याचे उत्तर खोत यांनी आज रत्नागिरी दिले.

प्रत्येक गोष्टीची एक सीमारेषा असते. आपण जेव्हा चळवळीत काम करत असतो. तेव्हा चळवळीत काम करणार्‍यालादेखील स्वत:च एक घर असत.

त्या घराला जेव्हा धक्का लागतो, तेव्हा त्यालाही वेदना होतात. असे म्हणत राजू शेट्टी यांच्या वक्तव्याला सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले.

LEAVE A REPLY

*