एलसीबीची धुरा कुराडेंकडे

0

जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-जळगाव पोलिस दलात धक्कादायक फेरबदल करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेची धुरा एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

तर तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी मानव संसाधन विभागात बदली करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी अचानक पोलिस दलात अचानक खांदेपालट केली आहे. या बदल्यांमुळे पोलिस दलात चांगलीची चर्चा रंगली आहे.

दरम्यान पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांनी सायंकाळी पोनि राजेशसिंह चंदेल यांच्याकडून स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्विकारला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून पोनि कुराडे यांनी यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची धुरा येणार असल्याची चर्चा होती. दरम्यान दि.11 च्या रात्री पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलिस दलातील अधिकार्‍यांचे खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल याच्या जागी पोनि कुराडे यांची नियुक्ती करण्यात आली.

तर एमआयडीसी पोलिस निरीक्षकपदी रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बापु रोहम यांची बदली करण्यात आली आहे.

त्यांच्याजागी वाहतुक शाखेचे पोनि. सतिष भामरे यांना पदभार देण्यात आला आहे. तर पोनि राजेशसिंह चंदेल यांची मानव संसाधन विभागात तर विलास सोनवणे यांची शहर वाहतुक शाखेला बदली करण्यात आली आहे.

भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे वसंत मोरे यांनी जळगाव टिएमसी शाखेला तर उपनिरीक्षक मुनुसफा पठाण यांची वाहतुक शाखेला बदली करण्यात आली आहे.

तसेच या प्रशासकीय बदल्यांमध्ये काही पोलिस उपनिरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली.

LEAVE A REPLY

*