‘यशवंतराव’ युवावर्गापर्यंत पोहचविण्यात पक्ष कमी पडला

0

जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-राज्याचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीची माहिती आणि त्यांचे कार्य युवावर्गापर्यंत पोहचविण्यात आपला पक्ष कमी पडला असल्याची खंत राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी आज येथे व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान अंतर्गत ‘जागर युवा संवाद परिषदेत’ विद्यार्थी व युवावर्गाशी खा. सुप्रिया सुळे यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

व्यासपिठावर जजिमविप्रचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिश पाटील, माजी आ. अरूण गुजराथी, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, संजय पवार, प्राचार्य एस.एन.देशमुख, माजी मंत्री गुलाबराव देवकर उपस्थित होते. जागर युवा परीषदेत खा. सुळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिलीत.

संवाद साधताना विद्यार्थ्यांना खा. सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रचे पहिले मुख्यमंत्री यशंवत चव्हाण यांच्या विषयी माहिती विचारली परंतु विद्याथ्र्यांकडून अपेक्षीत उत्तर मिळाले नाही.

यावर खा. सुळे यांनी, यशवंतराव चव्हाण यांचा इतिहास महाराष्ट्रात युवावर्गापर्यंत पोहचवण्यामध्ये आपला पक्ष कमी पडला आहे, अशी खंत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञाना स्विकार करायला हवा.

नविन आव्हानांना सामोरे जावुन युवावर्गाने लोकशाहीत घडणार्‍या घटनाचा अभ्यास करावा.देशात युवाची संख्या मोठी आहे. युवाशक्तीमध्ये बदल घडविण्याची ताकद असल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी राज्यात भेडसावणार्‍या समस्या शिक्षण क्षेत्रातील समस्या, शेतकरी कर्जमाफी, डीजिटल प्रणाली, कोपर्डी घटना दिव्यांग विषयी, बेरोजगारीची, देशातील संरक्षण, असे प्रश्न मांडले. यात मयुरी खरात, अमीत माळी, शुभांगी सपकाळे, हर्षल पाटील, क्रांती सोनवणे, सुमित तिवारी, गोपाल चौधरी, हर्षला पाटील, रोहन राजपुत, वाल्मिक तायडे, अश्विन साबळे, मुकेश सावकारे, वर्षा सोनवणे यांनी प्रश्र विचारले.

LEAVE A REPLY

*