फटाके विक्री : नियमांची पायमल्ली

0

जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-फटाके विक्रीसाठी परवानगी घेतल्यानंतर महानगरपालिकेकडून एनओसी घेणे अपेक्षित आहे. परंतु पाच दिवसावर दिवाळी असतांनाही एकाही विक्रेत्यांनी एनओसी घेतलेली नसल्याने नियमांचे पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.

राजकमल चौकात वर्दळीच्या दुकान थाटत असल्यामुळे आगीची अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शहर पोलीस विभागांनाही याची गंभीर दखल घेवून महानगरपालिकेला पत्र पाठवून अग्निशमन बंब राजकमल चौकात ठेवण्याची सूचना दिली आहे.

दिपावलीसाठी शिवतीर्थ मैदानावर तसेच सुभाष चौक ते बेंडाळे चौक दरम्यान फटाके विक्रीसाठी दुकान थाटली जातात. फटाके ज्वलनशिल असल्यामुळे उपाययोजना असणे अपेक्षित आहे.

राजकमल चौकात चार ते पाच वर्षापूर्वी प्रचंड मोठी आग लागली होती. त्यामुळे फटाके विक्रेत्यांनी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

प्रातांधिकार्‍यांकडून फटाके व्रिकीची परवानगी घेतल्यानंतरही महानगरपालिकेकडून एनओसी घेणे आवश्यक आहे. असे असतांनाही कुठल्याही फटाके विक्रेत्यांनी एनओसीसाठी मनपाकडे अद्यापपर्यंत अर्ज केलेला नसल्याचे अग्निशमन अधिकारी वसंत कोळी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*