बसमधून 791 किलो भेसळयुक्त खवा जप्त

0

जळगाव । दि. 12 । प्रतिनिधी-दिवाळीच्या मिठाईसाठी मोठया प्रमाणात खवा (मावा) वापरण्यात येतो. दरम्यान जळगावातील व्यापार्‍यांनी बाहेरगावावरून खवा मागविला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार परळी-जळगाव बस स्थानकात येताच बसच्या टपावर मागील सिटावर गोणपाटांमध्ये बांधून ठेवलेला 791 किलो भेसळयुक्त खावा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पकडला आहे.

परळी-जळगाव बसने खवा(मावा) जळगावात येत असल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुषंगाने अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी बसस्थानक परिसरात पाळत ठेवून सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परळी जळगाव बसच्या टपावरून व मागील सिटावरून गोणपाट मध्ये बांधून ठेवलेला 1 लाख 33 हजार 745 रुपये किंमतीचा 791 किलो खवा (मावा) जप्त केला.

दरम्यान तपासात तो खवा विसनजी नगरातील योगेश मुरारीलाल अग्रवाल, अनिल यशवंत सावंत रा. रामेश्वर कॉलनी व बबलु रामदास यादव यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
खवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. दरम्यान प्रयोगशाळाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिल गुजर व संदिप देवरे यांनी केली. दरम्यान दिवाळी पार्श्वभुमीवर भेसळयुक्त खाव्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने तपासणीची कारवाई सुरु राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

*