आ.वळसेंनी घेतली सुरेशदादांची भेट

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी आ.दिलीप वळसेपाटील यांनी आज शिवसेना नेते माजी आ.सुरेशदादा जैन यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष आ.दिलीप वळसेपाटील हे आज जळगाव दौर्‍यावर होते. या दौर्‍यात पक्षसंघटनेचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी त्यांनी शिवसेना नेते माजी आ.सुरेशदादा जैन यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.

माजी आ.सुरेशदादा जैन यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. सुमारे 15 मिनीटे या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड.रविंद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार उपस्थित होते.

राजकीय चर्चा नाही – अ‍ॅड.पाटील
आ.दिलीप वळसेपाटील यांनी सुरेशदादांची केवळ सदिच्छा भेट घेतली. या भेटीत प्रकृतीची विचारपुस करण्यात आली. बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे अ‍ॅड.रविंद्रभैय्या पाटील यांनी सांगितले.

 

 

 

LEAVE A REPLY

*