अमृतच्या निविदेवर मनपाने मागितले शासनाकडे मार्गदर्शन

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झालेल्या निवीदा धारकाची निवीदा औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली.

या आदेशाची प्रत मनपाने राज्यशासनाकडे पाठविली असून यावर मार्गदर्शन मागविले आहे. मार्गदर्शन मिळाल्यानंतर पुढची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी दिली.

शासनाच्या अमृत योजनेंतर्गत जळगाव महापालिकेसाठी 290 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने संतोष इन्फ्रा प्रा. लि. व विजय कन्स्ट्रक्शन लि. यांची कमी दराची निविदा मंजुर केली होती. यावर जैन इरिगेशन प्रा. लि. ने हरकत घेवून औरंगाबाद याचीका दाखल केली होती.

यावर खंडपीठाने मंजूर निविदाधारकाची निविदा रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशाची प्रत मनपाला प्राप्त झाली आहे.

दरम्यान पुढील निवीदा प्रक्रिया राबविण्यासाठी मनपा प्रशासनाने आदेशाची प्रत राज्यशासनाकडे पाठविली असून यावर मार्गदर्शन देखील मागविले आहे. शासनाचे मार्गदर्शन आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*