आयुक्तांनी नाकारलेल्या स्वेटर खरेदीला स्थायी समितीची 2 कोटींची तरतूद

0
पुणे / मनपाचे आर्थिक अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मांडण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या स्वेटर खरेदीला आयुक्तानी नकार दर्शविला होता.
तरी स्थायी समितीने स्वेटर खरेदीसाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मनपातील शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपवून नवीन शिक्षण समिती तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षण मंडळाचे वेगळे अंदाजपत्रक सादर करण्यात आले नाही.

पालिकेच्या अंदाजपत्रकातच शिक्षण विभागाच्या खर्चांचा समावेश करण्यात आला. गतवर्षी शिक्षणासाठी 335 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

तरी यंदा खर्चाला कपात करत फक्त 305 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे 2017-18 या आर्थिक वर्षाच्या महापालिका प्रशासनाच्या अंदाजपत्रकात आयुक्त कुणाल कुमार यांनी शिक्षण मंडळासाठी 311 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

तर दुसरीकडे स्वेटर खरेदीला आयुक्तांनी रेड सिग्नल दाखवूनही स्थायी समितीने 2 कोटींची तरतूद केली आहे.

यामुळे मनपा आयुक्त व स्थायी समिती यांच्यामधील विसंवादाची बाजू समोर आली आहे.

LEAVE A REPLY

*