पल्लव साहेबने वर्सी महोत्सवाची भक्तीमय वातावरणात सांगता

0

जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-पूज्य अमर शहीद संत कंवरराम याचा 60 वा वर्सी, पूज्य संत हरदासराम यांच्या 40 तर संत बाबा गेलाराम यांच्या 9 वी वर्सी महोत्सव गेल्या चार दिवसांपासून सुरु होता. या महोत्सवाची सांगता पल्लव साहेबने करण्यात आली. यावेळी भाविकांनी भक्तीगीतांवर गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला.

शहरात गेल्या 50 वषार्ंपासून सुरु असलेल्या सिंधी समाजाचे अमर शहीद संत कंवरराम साहब व संत बाबा हरदासराम साहब गोदडीवालेबाबा व संत बाबा गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सवाला दि. 8 रोजी पासून सुरुवात झाली. दरम्यान चार दिवसाच्या वर्सी महोत्सवाला देशभरातून भाविकांची उपस्थिती होती.

दरम्यान आज सकाळी 11 वाजता अमरावती येथील साई राजेशकुमार, संत बाबा गेलाराम यांचे शिष्य देवीदासभाई, विलासपुर येथील बलरामसांई या संतांच्या उपस्थितीत पल्लव साहेबच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यामध्ये संतांनी लहान बालकांना आपल्या झोळीत टाकून परमेश्वराकडे त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रार्थना करुन त्यांना आशिर्वाद दिले. तसेच भाविकांनी देखील विश्वशांती, सुख समृद्धीसाठी प्रार्थना करुन भक्तीगीतांवर आनंदोत्सव साजरा केला.

त्यानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करुन दुपारी 36 वाजेच्या सुमारास मोठ्या भक्तीमय वातावरणात पल्लव साहेबने चार दिवसापासून सुरु असलेल्या वर्सी महोत्सवाची सांगता करण्यात आली.

यावेळी भाविक मोठया संख्येने उपस्थितीत होते. तसेच पोलिस प्रशासन, महानगरपालिका यांच्यासह वाहतुक पोलिसांचे ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

वर्सी महोत्सव पार पाडण्यासाठी संत बाबा हरदासराम साहेब व संतबाबा गेलाराम साहेब ट्रस्ट, संत बाबा जुडीयाराम, नशिराबाद पंचायत, समाधा आश्रम, एसएसडी मंडळ, बीएचआर महिला मंडळ, एसएसडी महिला मंडळ यांच्यासह अशोक मंधान, टिकाराम तेजवाणी, सुरेश केसवाणी, शंकरलाल लखवाणी, देवानंद लखवाणी, राजू आडवाणी, सतिष पंजाबी, राम कटारीया, हेमू भावनानी यांनी परिश्रम घेतले.

भक्तांना भोजन पाकीटाचे वाटप
शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या वर्सी महोत्सवात देशभरातून भाविक दाखल झाले होते. दरम्यान आज या महोत्सवाची दुपारी सांगता झाल्यानंतर परगावाहून महोत्सवासाठी आलेले भाविक परतीच्या प्रवासाला निघाले होते. यावेळी परतीच्या प्रवासाला निघालेल्या भक्तांनी पुढच्या वर्षी देखील महोत्सवाला येणार असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. दरम्यान या भक्तांना संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम ट्रस्टच्या वतीने भोजन पाकीटांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

*