.. तर स्मार्ट फोनमुळे जाऊ शकते तुमीच दृष्टी

0
मुंबई | वृत्तसंस्था : स्मार्टफोनचा वापर वाढत जात असून त्याच्यात असलेले वैविध्यपूर्ण फिचर्स अनेकांना वेड लावत आहेत. चित्रपट व गेम खेळण्याकडे जास्त कल दिसून येत आहे. स्मार्ट फोनचा जास्त वेळ वापर केल्याने दृष्टी गमवात कायमचे अंधत्व येण्याची घटना नुकतीच चिनमध्ये उघडकीस आली आहे.
चीनमधील एका २१ वर्षीय तरुणीला अापल्या स्मार्टफाेनवर सतत २४ तास गेम खेळल्यामुळे एका डाेळ्याची दृष्टी गमवावी लागली अाहे. ही तरुणी अाॅनलाइन गेम ‘अाॅनर अाॅफ किंग्ज’च्या पूर्णत: अाहारी गेली हाेती.
हा गेम खेळल्याने सुरुवातीला तिला अंधूकसे दिसू लागले हाेते; परंतु हळूहळू तिच्या एका डाेळ्याची दृष्टी पूर्णपणे गेली, असे तिने सांगितले.
या तरुणीवर नॅचांग सिटी रुग्णालयात रॅटिनल अार्टेरी अाेक्लुजनचे उपचार सुरू अाहेत. डाेळ्यांचा हा अाजार वयस्क लाेकांना हाेताे. डाेळ्यांवर अत्याधिक दबाव अाल्यास वा प्रमाणाबाहेर जागरण केल्यास हा अाजार हाेतो.

LEAVE A REPLY

*