हिंसा घडवून आणण्याचा कट आपणच रचला : हनीप्रीतची पोलिसांजवळ कबुली

0
चंदीगड | वृत्तसंस्था :  रामरहीमला न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर हिंसा घडवून आणण्याचा कट आपणच रचला होता, अशी कबुली हनीप्रीतने दिल्याचं सुत्रांनी सांगितलं. पंचकुला पोलिसांनी हनीप्रीतची कसून चौकशी केल्यानंतर तिने याबाबतची कबुली दिली.

हनीप्रीतच्या ड्रायव्हर राकेशनेही तिनेच या हिंसेचा मास्टर प्लान आखला होता आणि तिच या हिंसेची मास्टर माइंड होती, अशी कबुली दिली असल्याचंही सुत्रांनी सांगितलं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हनीप्रीतच्या लॅपटॉपमध्ये हिंसा भडकाविण्याचा पूर्ण प्लान तयार करण्यात आला होता. हा लॅपटॉप महत्त्वाचा पुरावा असून तो मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. शिवाय हनीप्रीतच्या मोबाइलचाही पोलिसांनी शोध घ्यायला सुरूवात केली आहे.

पंचकुला येथे हिंसा झाल्यानंतर हनीप्रीत ३८ दिवस गायब होती. ३ ऑक्टोबर रोजी तिला जिरकपूर-पटियाला रोडवर अटक करण्यात आली होती. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.

४०० प्रश्न विचारले

हनीप्रीत पोलिसांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नव्हती. परंतू अटक करण्यात आलेल्या सुखदीप कौरने तोंड उघडताच या प्रकरणाला नवी दिशा मिळाली. पोलिसांनी सोमवारी हनीप्रीत आणि तिचा चालक राकेश अरोराला समोरासमोर बसवले आणि त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. पोलिसांनी या दोघांना एकूण ४०० प्रश्न विचारले. त्यातील केवळ ८५ प्रश्नांचीच उत्तरे हनीप्रीतने दिली. यावेळी ती सतत कबुली जबाब बदलत होती

LEAVE A REPLY

*