मुख्याध्यापक, वर्ग शिक्षकाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश

0
जळगाव |  प्रतिनिधी :  शहरातील मिल्लत हायस्कुलमध्ये इयत्ता सहावीत शिकणार्‍या विद्यार्थींनीला वगात चक्कर आल्यानंतर तिला दवाखान्यात न नेता वर्गातच बसवून ठेवल्याप्रकरणी पालकाच्या तक्रारीवरून शाळेचे मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकाची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील मिल्लत हायस्कुलमध्ये २९ सप्टेंबर रोजी सहावीच्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनीला अचानक चक्कर आले. त्यामुळे ती विद्यार्थिनी वर्गातच कोसळली.

मात्र संबधित वर्गाच्या वर्गशिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी या विद्यार्थिनीला तत्काळ उपचारासाठी न नेता, याबाबत पालकांना माहिती दिली व विद्यार्थिनीला वर्गातच थांबवून ठेवले. त्यानंतर ५० मिनीटानंतर पालकांनी शाळेत हजेरी लावली.

वर्ग शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थिनीला त्रास वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे संबधित विद्यार्थिनीचे पालक जिया बागवान यांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती.

शिक्षणाधिकार्‍यांनी संबधित वर्ग शिक्षक व मुख्याध्यापकाना खुलासे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुख्याध्यापकांनी सादर केलेल्या खुलास्यामध्ये त्यांनी दिलेली माहिती समाधानकारक नसल्याने त्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

*