श्रीदेवीची पर्स आठ लाख रुपयांची

0
मुंबई | वृत्तसंस्था :  उंची लोगोंकी पसंदही उंची होती है, असे म्हटले जाते. अभिनेत्री श्रीदेवीची ही नेहमीच तिच्या स्टाईल आणि लूकमुळे चर्चेत असते.

महागड्या वस्तू मिरवण्याचा तिला शौक आहे, अगदी ङ्गजुदाईफ सिनेमात तिने केलेल्या काजल वर्मा नावाच्या कॅरेक्टरसारखाच तिचा स्वभाव आहे. आता हेच पहा ना.. नुकतीच श्रीदेवी सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी हिने आयोजित केलेल्या एका चॅरिटी प्रदर्शनात पोहोचली ती लाखमोलाची पर्स घेऊन.

होय, तुम्ही वाचले ते खरेच आहे कारण या पर्सची किंमत आहे आठ लाख रुपये. या इव्हेंटमध्ये पोहोचलेली श्रीदेवी खूपच सुंदर दिसत होती.

मात्र, ती तिच्या लूकपेक्षा तिच्याकडे असलेल्या पर्समुळेच अधिक चर्चेत राहिली. कारण तिच्याकडे असलेली पर्स ही लाखमोलाची होती. या पर्सची किंमत ऐकाल तर तुम्हाला कदाचित चक्कर येईल.

कारण या पर्सच्या किमतीने एखाद्या सर्वसामान्याला घर खरेदी करता येईल. होय, या पर्सची किंमत आठ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

LEAVE A REPLY

*