…तिथे भरतो चक्क उपवर मुलींचा बाजार

0
लंडन | वृत्तसंस्था :  युरोपातील बुल्गेरिया देशात स्टारा जगोरा नावाचे एक अनोखे ठिकाण आहे. आतापर्यंत कृषी मेळा, खाद्य मेळा वा वाहन मेळा पाहिले असतील, पण स्टारा जगोरामध्ये चक्क उपवर मुलींच्या मेळ्याचे आयोजन केले जाते व तेही वर्षातून चारदा.

हा एक खास प्रकारचा मेळा असतो. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या बुल्गेरियातील लोक मागील अनेक पिढ्यांपासून अशा मेळ्यांचे आयोजन करतात. या मेळ्याची खासियत म्हणजे, जे लोक आपल्या उपवर मुलीसाठी चांगला वर शोधू शकत नाहीत वा त्यांचा धूमधडाक्यात विवाह करू शकत नाहीत, ते मुलींना मेळ्यामध्ये घेऊन येतात.

या तरुणीही मनाजोग्या पतीचा शोध घेण्यासाठी अतिशय नटूनथटून असतात. काहीजणी तर भडक कपडे घालून येतात. त्यांच्यातील बहुतांश मुलींसोबत त्यांचे आईवडील असतात व तेही असे करण्यापासून मुलींना रोखत नाही. या मेळ्यामध्ये वधूचा शोध घेण्यासाठी अनेक तरुण व प्रौढसुद्धा हजेरी लावतात.

ते या मुलींसोबत गप्पा मारतात व थोडाफार वेळ सोबत घालवतात. या संपर्कातून ज्या जोडप्यांचे सूर एकमेकांसोबत जुळतात, तेव्हा मुलाच्या घरची मंडळी मुलीच्या कुटुंबियांना पैसे देतात आणि त्यांच्या मुलीला आपली सूनबाई समजतात..

LEAVE A REPLY

*