स्थायी समिती, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी ज्योती इंगळे, प्रतिभा कापसे

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-मनपा स्थायी समिती सभापतीपदी खाविआच्या ज्योती इंगळे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीची घोषणा पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली. निवडीनंतर नुतन सभापतींचा सत्कार करण्यात आला.

मनपा स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापती पदाच्या निवडीसाठी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत सभा झाली.

यावेळी व्यासपीठावर प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे, नगरसचिव अनिल वानखेडे उपस्थित होते. सकाळी 11 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.

स्थायी समिती सभापतीपदासाठी ज्योती इंगळे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रतिभा कापसे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केली.

दरम्यान नुतन सभापतींचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी खाविआचे अध्यक्ष रमेशदादा जैन, उपमहापौर गणेश सोनवणे, गटनेते सुनिल महाजन, नितीन बरडे, अमर जैन, अजय पाटील, सुनिल पाटील, बंटी जोशी, सुरेश सोनवणे, चेतन शिरसाळे, नवनाथ दारकुंडे, अ‍ॅड.शुचिता हाडा, दिपमाला काळे, ममता कोल्हे, संगीता राणे, जयश्री महाजन, वर्षा खडके, ज्योती तायडे, कांचन सोनवणे, पदमाबाई सोनवणे, लता मोरे, लिना पवार, उज्वला बेंडाळे, सविता शिरसाठ, ज्योती चव्हाण, शालिनी काळे आदी उपस्थित होते. सभापतीपदी निवड झाल्यानंतर नुतन सभापतींनी पदभार घेतला. यावेळी महानगरपालिकेच्या प्रांगणात फटाक्यांची आतषबाजी करुन व ढोलताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला.

 

महिला बालकल्याण समिती सभापतीपदाचा बहुमान मिळाला आहे. महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील व गरजू महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेवून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार.


– प्रतिभा कापसे,
नुतन सभापती, महिला बालकल्याण समिती

आमचे नेते सुरेशदादा जैन, रमेशदादा जैन यांनी सभापती पदाची संधी देवून माझ्यावर विश्वास टाकला आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्या सहकार्यातून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल.


– ज्योती इंगळे,
नुतन सभापती, स्थाायी समिती

 

LEAVE A REPLY

*