माजी आ.शरद वाणी यांचे निधन : आज अंत्ययात्रा

0

जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-नवीपेठ येथील रहिवासी माजी आमदार अ‍ॅड.शरद वाणी यांचे दि.10 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.11 रोजी सकाळी 9 वाजता राहत्या घरुन निघेल.

माजी आमदार अ‍ॅड.शरद वाणी हे 1995 मध्ये अपक्ष तर 2000 मध्ये शिवसेेनेचे विधान परिषद सदस्य होते. त्यापूर्वी त्यांनी तत्कालीन जळगाव नगरपालिकेत उपनगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापती असे अनेक पदे भुषविली होती.

तीन टर्म ते नगरसेवक राहिलेत. त्यांनी नपाच्या अनेक खटल्यात न्यायालयीन बाजू मांडली होती. माजी आ.सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक म्हणून जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राला ते परिचीत होते.

माजी आ.वाणी यांनी 1976 ते 2000 या कालावधीतील सुरेशदाद जैन यांच्या सहवासातील आठवणी, त्यांनी केलेले विकास कामे, त्यांची वाटचाल आणि कर्तुत्व यावर उहापोह करणारे ‘सुरेशदादा जैन’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

माजी आ.शरद वाणी यांना दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. शामकांत वाणी यांचे ते मोठे बंधु तर चंद्रशेखर आणि शैलेश यांचे वडील होत.

LEAVE A REPLY

*