जि.प.शाळेतील विद्यार्थ्याच्या गणवेशासाठी डाक विभागाचा पुढाकार

0

जळगाव । दि. 10 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेत शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी राष्ट्रीयकृत बँकेत 500 रुपये देवून खाते उघडणे विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टया परवडणारे नव्हते.

त्यामुळे शैक्षणिक वर्षातील सहा महिने होवून देखील विद्यार्थ्यांना गणवेश किंवा गणवेशाची रक्कम न मिळाल्याने विद्यार्थी वंचित होते. त्यामुळे डाक विभागाने पुढाकार घेवून फक्त 50 रुपयांवर विद्यार्थ्यांचे खाते उघडून देण्यास संमती दर्शविल्याने आता विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम तात्काळ मिळू शकणार आहे.

जिल्हा परिषदेच्या व नगरपालिकेच्या 1892 शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व मुली व एसस्सी, एसटी व बीपीएल कार्डधारक मुलांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत गणवेश देण्यात येतो.

यासाठी यावर्षी लाभाथी विद्यार्थ्यांसह आईच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून गणवेशाच्या 400 रुपयांचे अनुदान गणवेशाची बिले सादर केल्यानंतर थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार होते.

परंतू यासाठी लाभार्थ्यांला राष्ट्रीयकृत बँकेत 500 रुपयांचे बँक खाते 500 रुपयांचे खाते उघडावे लागणार आहे. शाळा सुरु होवून चार महिने होवून देखील 70 टक्के विद्यार्थ्यांनी खाते न उघडल्याने तसेच गणवेशाची बिले न सादर केल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित असल्याची माहिती समोर आली होती.

याबाबत जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी बँकेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून शुन्य रक्कमेवर बँकेत खाते उघडण्यात यावे अशा सुचना दिल्या होत्या. तरी देखील बँका शुन्य रकमेवर खाते उघडण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे विद्यार्थी बँकेत खाते न उघडू शकल्याने गणवेशापासून वंचित होते.

गणवेशासाठी 6 कोटीचे अनुदान उपलब्ध
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठीचे 6 कोटी 38 लाखांचे अनुदान सर्व शिक्षा अभियानांतर्गत तालुकास्तरावर मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. निधी उपलब्ध असून देखील विद्यार्थी गणवेशासाठी वंचित आहे.

डाक विभागाने काढले पत्र
शासनाकडून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या विद्याथ्यार्ंच्या गणवेशासाठी यावर्षी 400 रुपयांची रक्कम देण्यात येत आहे. परंतू राष्ट्रीयकृत बँकेत खाते न उघडू शकल्याने जवळपास 70 टक्के विद्यार्थी गणवेशाच्या रक्कमेपासून वंचित होते. त्यामुळे डाक विभागाने पुढाकार दर्शवून शिक्षण विभागाची चर्चा करून 50 रुपयांच्या रक्कमेवर खाते उघडून देण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार डाक अधिक्षक यांनी जिल्हयातील सर्व पोस्ट विभागाने पत्र काढून 50 रुपयांवर विद्याथ्यार्ंचे खाते उघडावे असे सुचित केले.

 

LEAVE A REPLY

*