जिल्ह्यातील 785 महसूल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

0

जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-महसूल कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. कामबंद आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्ह्यातील 785 दरम्यान कर्मचार्‍यांनी कामबंद ठेवले. त्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांचे देखील हालचाल झाले. कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

महसूल कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली. तरीही देखील न्याय मिळाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने देखील आजपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिल कार्यालयात कर्मचारी हजर होते.

मात्र त्यांनी कामबंद ठेवल्यामुळे कामकाजावर परिणाम झाला. शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांना परत जावे लागल्याने हाल झाले.

या आंदोलनात जिल्हाधिकारी कार्यालयातील 150, तहसिलदार कार्यालयातील 35 तर जिल्हाभरातून 785 महसूलचे कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कामबंद आंदोलनात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप बारी, जिल्हाध्यक्ष शैलेंद्रसिंग परदेशी, कार्याध्यक्ष योगेश नन्नवरे, सरचिटणीस अमोल जुमडे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले.

अशा आहेत मागण्या
महसूल खात्यातील लिपीकाचे पदनाम महसूल सहाय्यक करणे, नायब तहसिलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरुन दि.1 जानेवारी 2006 पासून तो 4800 करण्याचे मान्य केले होते.

त्याबाबत शासन निर्णय निर्गमित करावा, अव्वल कारकुन संवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दुर कुरणे, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देणे, नायब तहसिलदारांचे सरळसेवा भरतीची प्रमाणे 33 टक्के वरुन 20 टक्के वरुन पदोन्नतीचे प्रमाणे 80 टक्के करणे, दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावानुसार आकृतीबंधात सुधारणा करण्यासाठी जी लिपीक, अव्वल कारकुन, नायब तहलिसदार व इतर पदे वाढविली आहेत त्यात कपात न करणे, संजय गांधी योजना, गौण खनिज व महसुलेतर इतर कामासाठी नवीन आकृतीबंध तयार करणे, महसुल विभागातील
व्यपगत झालेली पदे पनुर्जिवीत करणे, वर्षानुवर्षे कार्यरत असलेली अस्थायी स्वरुपाची पदे स्थायी करणे.

 

मुद्रांक विक्रेत्यांच्या बंदमुळे लाखो रुपयाचा बुडतोय महसूल
मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांनी विविध मागण्यांसाठी अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र शासन केवळ वेळ काढूपणा करीत आहे. यामुळे मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांवर अन्याय होत आहे. न्याय मागण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर हे आंदोलन पुकारण्यात आले. मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांच्या बंद आंदोलनामुळे तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात, सर्व तालुक्यात मुद्रांक विक्रीच्या ठिकाणी आज शुकशुकाट दिसून आला. दरम्यान आज आ.राजूमामा भोळे यांनी तहसिलदार कार्यालयासमोर मुद्रांक विक्रेत्यांची भेट घेतली. यावेळी मुद्रांक विक्रेत्यांनी निवेदन दिले. यावर आ.भोळे यांनी महसुल मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांची भेट घेवून प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.

 

LEAVE A REPLY

*