भोगसाहबला भाविकांची मांदियाळी : नाथाभाऊ, सुरेशदादांनी घेतले दर्शन

0

जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-पूज्य अमर शहीद संत कंवरराम यांचा 60 वा वर्सी, पूज्य संत हरदासराम यांच्या 40 तर संत बाबा गेलाराम यांच्या 9 वी वर्सी महोत्सव गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे.

आज भक्तीमय वातावरणात आणि हजारोभाविकांच्या उपस्थितीत अखंडपठन व भोगसाहब पार पडला. उद्या दि. 11 रोजी पल्लवने सांगता होणार आहे.

वर्सी महोत्सवात आज पहाटे 5 वाजता संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम यांच्या समाधीला संताच्या उपस्थितीत पंचामृताने स्नान करण्यात आले.

त्यानंतर झेंडापूजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी भक्तीमय वातावरणात आणि हजारोभाविकांच्या उपस्थितीत अखंडपठन व भोगसाहब पार पडला.

याप्रसंगी भाविकांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर अमरावती येथील प. पू. सांई राजेशकुमार, लखनऊ येथील सांई चांडूराम साहेब, विलासपुर येथील बलरामसांई, देवीदासभाई यांनी आपल्या प्रवचनातूनल संताची सेवा कशी करावी, आदर्श जीवन कस जगावं याविषयी संतांच्या कार्याचे दाखले देवून त्यांना मार्गदर्शन केले. भोगसाहेबसाठी समाजबांधवांनी दुकाने बंद ठेवून हजेरी लावली होती. उद्या दि. 11 रोजी विविध कार्यक्रमांनंतर पल्लवने वर्सी महोत्सवाची सांगता होणार आहे.

नाथाभाऊ, सुरेशदादांनी घेतले दर्शन

आ. एकनाथराव खडसे व माजी आ. सुरेशदादा जैन यांनी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास वर्सी महोत्सवालला भेट देवून दर्शन घेतले. यावेळी संत मनोहरलाल यांचे नातू साई राजेशकुमार यांच्या हस्ते नाथाभाऊ आणि सुरेशदादा यांचा एकाच शालने सत्कार करण्यात आला. दरम्यान अगले साल आप दोने साथ मै ही आना अश्या शब्दात संत साई राजेशकुमार यांनी आर्शिवाद दिला. नाथाभाऊ आणि सुरेशदादा एकत्र दिसल्यामुळे ‘भाऊ और दादा आप दोनो अगले साल मंत्री बन के आर्शिवाद के लिए आना’ अशी अपेक्षा डॉ.गुरुमुख जगवाणी, अशोक मंधान, राजकुमार अडवाणी, रमेश मताणी, हिरानंद मंधवानी यांच्यासह उपस्थित सिंधी समाजबांधवांनी केली.

LEAVE A REPLY

*