समाजहितासाठी माध्यमांची मोठी ताकद – प्रा.माहुलीकर

0

जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-समाजातील व्यथा मांडण्यासाठी आणि न्याय देण्यासाठी माध्यमांमध्ये फार मोठी ताकद आहे. लोकशाहीच्या या चौथा स्तंभाने आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे समाजाला अपेक्षित आहे, असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी प्रा. पी. पी. माहुलीकर यांनी केले.

विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मिती आणि संपादन या विषयावर दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. माहुलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

तर समारोप कुलसचिव बी.बी.पाटील यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी मंचावर इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे विकास भदाणे, मनिष जोग, नरेंद्र कदम, सुनिल चौधरी, अनिल केराळे, यांच्यासह कार्यशाळेचे संयोजक डॉ. सुधीर भटकर, विभागप्रमुख डॉ. तुकाराम दौड, डॉ. विनोद निताळे, डॉ. सोमनाथ वडनेरे उपस्थित होते. प्रास्तविक डॉ. सुधीर भटकर यांनी केले. सूत्रसंचालन विशाल धनगर यांनी केले. परिचय अक्षय महाजन यांनी करुन दिला तर आभार राहूल चव्हाण यांनी मानले.

मुल्यनिष्ठ समाजनिर्मितीची पत्रकारिता करावी – कुलसचिव पाटील
पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करतांना सकारात्मक दृष्टीकोण अंगिकारावा. मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीची पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन कुलसचिव बी.बी.पाटील यांनी केले. ते दोन दिवशी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलत होते. आजच्या सत्रात चंद्रशेखर नेवे, शुभदा नेवे, अयाज मोहसीम, हकीम देशमुख यांनी मार्गदर्शन केले. परिचय गिरीष सोनवणे यांनी करुन दिला. सूत्रसंचलन योगेश पाटील, रुचिता चौधरी तर आभार जयवंत सिसोदे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*