चायना लाईटींगकडे ग्राहकांची पाठ

0

जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-दिपोत्सवासाठी बाजारपेठेत लगबग सुरु झाली आहे. घरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करुन झगमगाट करण्यासाठी लाईटींगस् बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत.

मात्र चायना बनावटीच्या लाईटींगकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून यावर्षी पहिल्यांदा भारतीय बनावटीच्या लाईटींगस्ला पसंती दिली जात आहे. तसेच विविध प्रकारच्या आकाशकंदीलांची देखील ग्रहकांकडून खरेदी केली जात आहे.

दिवाळीत घराला उजळून टाकण्यासाठी तसेच घराला आकर्षीत करण्यासाठी ज्या प्रमाणे पणत्यांना महत्व आहे. तितकेच महत्व हे लाईटिंगला आणि आकाशकंदिला देखील आहे.

दरम्यान दिवाळीत ग्राहकांसाठी विविध प्रकार्‍या लाईटिंग व आकाशकंदिल विक्रीसाठी दाखल झाले आहे. यांमध्ये भारतीय बनावटीच्या लाईटिंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

शहरातील मुख्यबाजारपेठांसह चित्रा चौक, सुभाष चौक यांठिकाणी असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकांनावर ग्राहकांकडून लाईटिंगची खरेदी करण्यात आहे.

त्याचप्रमाणे ग्राहक पारंपारिक लाईटिंगसह आधुनिक लाईटिंगला व वेगवेगळ्या आकारातील एलईडी लाईट्सला देखील आधिक पसंती दिली जात आहे. तसेच यंदा लाईटिंगच्या भावामध्ये दहा टक्क्यांनी भाव वाढ झाल्याची माहीती शहरातील लाईटिंग विक्रेत्यांनी दिली.

या वस्तूंना अधिक मागणी
प्रकाशपर्वात घराला आकर्षीत करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लाईटिंगचे विविध प्रकार बाजारात विक्रीसाठी आले आहेत. यांमध्ये कॅपवाली, छोटी एलईडि, झालर, सिल्की एलईडि, कॅपसुल, रॉकेट फ्रॉस्टेड, बारीक एलईडि, पट्टीवाली, फुलवाली, झरना, दिव्याच्या आकारातील यांसह आकाश कंदिलांमध्ये चांदणी, गोल, षटकोनी यासह प्लास्टिक, कापडी व कागदी आकाशकंदिलांना ग्राहकांकडून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*