पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार

0
मुंबई | वृत्तसंस्था :  केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करत सामान्यांना आणखी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

त्यामुळे आता राज्यभरात पेट्रोलचे दर लिटरमागे दोन रुपयांनी तर डिझेलचे दर एका रुपयाने कमी होतील. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळेल. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्राकडून हे पाऊल उचलण्यात आले.

इतर महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर चढे राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २५ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २६ टक्के व्हॅट लावते.

त्याशिवाय लिटरमागे ११ रुपयांचा अधिभार आकारला जातो. डिझेलवर राज्य सरकार मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २१ टक्के तर राज्यात इतर ठिकाणी २२ टक्के व्हॅट लावते.

त्याशिवाय लिटरमागे दोन रुपयांचा अधिभार आकारला जातो. पेट्रोल, डिझेलवरील व्हॅटमधून सरकारला १९ हजार कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो.

LEAVE A REPLY

*