आधार कार्ड दाखवा मोदींच्या कार्यक्रमात सहभागी व्हा : पटना विद्यापीठाचा फतवा

0
 पटना :   पटना विद्यापीठातील मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पीएचडी करणाऱ्यांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.  शनिवारी पंतप्रधान मोदी पटना विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

याआधी इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने रुग्णांना दाखल करुन घेताना आधार कार्ड सक्तीचे केले आहे. याच पार्श्वभूमीवर पटना विद्यापीठानेही मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार कार्डची सक्ती केली आहे. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी, अशा प्रकारच्या सूचना दिल्याचे विद्यापीठाच्या उपकुलगुरु डॉली सिन्हांनी दिली. या कार्यक्रमाला केवळ पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि पीएचडी करणारे विद्यार्थीच उपस्थित राहू शकतात. त्यासाठीही त्यांना आधार कार्ड दाखवावे लागेल.

विद्यार्थी संघटनेशी संबंधित असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  याशिवाय पदवीचे शिक्षण घेणाऱ्या मर्यादित विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी एनसीसी किंवा एनएसएसशी संबंधित असल्यास त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल.

विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याने तिने नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमाला मोदींसह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

*