दहशतवादी खालिदचा प्रेमानं केला ‘घात’ : सुरक्षा दलांनी घातले कंठस्नान

0
श्रीनगर :  प्रेम आणि युध्दात सर्व काही क्षम्य असते असे म्हणतात. प्रेमात आणि युध्दात जर कोणी दगा दिला तर दगा देणार्‍यांचा खातमा झाल्याशिवाय राहत नाही. याचा पुर्नप्रत्यय दहशवादी अबु खालीदच्या बाबतील आला. प्रेमात प्रेयसीला धोका दिल्याने तीने अबू खलिदाची माहिती देत त्यांचा सुरक्षादलांकडून खातमा केला.

खालिदचा प्रेमानं ‘घात’ केला, असं सूत्रांनी सांगितलं. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडनं त्याला धोका दिला. त्याच्या हालचाली आणि ठावठिकाण्यांची ‘टीप’ तिनं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना दिली. विशेष म्हणजे ही माहिती देण्यासाठी तिनं ‘कोर्डवर्ड’चा वापर केला होता.

खालिदच्या आयुष्यात १७ मुली

जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अबु खालिदच्या आयुष्यात १७ मुली आल्या होत्या. त्यापैकी एकीनं सुरक्षा दलाला ‘खबर’ दिली. खालिदनं तिला धोका दिला होता.

त्यामुळं ती नाराज होती. खालिदचं प्रेम खरं नाही याची तिला जाणीव झाली होती. त्याच रागातून तिनं सुरक्षा दलाला मदत केली. त्याचा ठावठिकाणा, हालचालींची माहिती देण्यासाठी तिनं ‘जहन्नुम’ हा कोडवर्ड ठेवला होता.

तिनंच हा कोडवर्ड जाणीवपूर्वक ठेवला होता. खालिदनं आपलं आयुष्य ‘जहन्नुम’ केलं, असा तिचा समज झाला होता. खालिद तिच्या घरी आला तेव्हा तिनं याच कोडवर्डचा वापर करून सुरक्षा दलाला ही माहिती दिली. त्याआधारे सुरक्षा दलानं खालिदला घेरलं आणि ठार केलं.

LEAVE A REPLY

*