आबुधाबीच्या ‘बिग टिकीट ड्रॉ’ लॉटरीत आठ भारतीय कोट्याधीश

0
आबुंधाबी | येथील बिग टिकिट ड्रॉ च्या लॉटरी सोडतीत दहा जणांना लॉटरी लागली आहे. या दहात आठ भारतीय आहेत. त्यांना १.७८ कोटी एवढी रक्कम मिळणार आहे.

आबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिग टिकिट ड्रॉचे आयोजन केले होते. युएई मधील सर्वात मोठा लकी ड्रॉ मानला जातो. यात विजेत्याला दर महिन्याला रोख बक्षिसांसोबतच आलिशान गाड्या मिळतात. आठ भारतीय व दोन कॅनेडीयन नागरीकांना हे बक्षिस मिळाले आहे.

अभय कुमार कृष्णन यांनी मित्रासोबत हे तिकिट घेतले होते. त्यामुळे बक्षिसाची रक्कमही ते वाटून घेणार आहेत.

LEAVE A REPLY

*