चिमुकलीवर अत्याचार आरोपीला 10 वर्षाची सक्तमजुरी

0

जळगाव । प्रतिनिधी-चार वर्षाच्या चिमुकलीला घरात बोलावून तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा व 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

धरणगाव येथील नेमीलाल सुकलाल पाटील वय 35 याने दि.21 फ्रेबुवारी 2013 रोजी दुपारी परिसरातील चार वर्षीय चिमुकलीला घरी बोलावून तिच्यावर लैगिंग अत्याचार केला होता.

याप्रकरणी धरणगाव पोलिसात नेमीलाल पाटील याच्या विरोधात चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात असून आरोपी नेमीलाल यांस लहान मुलांचे लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4 व 6 खाली दोषी ठरविण्यात येवून 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिन्याची साधी कैद शिक्षा सुनावली.

दंडातील 5 हजार रक्कम पिडीत चिमुकलीला देण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. के.बी. अग्रवाल यांनी दिले. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

याच्या साक्षी ठरल्या महत्वापूर्ण – चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी खटल्यात पिडीत चिमुकलीची आई, पंच साक्षीदार राहुल बडगुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा निरमले, तपासधिकारी तत्कालीन पोलिस निरीक्षक सिनगारे, सपोनि दिलीप गढरी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

LEAVE A REPLY

*