अडावद येथे पाटचारीत बुडून भावांचा मृत्यू

0

अडावद, ता. चोपडा। दि.9 वार्ताहर-येथील धोबीघाटा जवळील पाटचारीवर दि. 9 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आदिवासी वस्तीतील बालके खेळत होती. त्यातील काशिराम लंगड्या बारेला (वय 9) आणि त्याचा लहान भाऊ किनपाराम लंगड्या बारेला (वय 7) हे पाटचारीत आंघोळ करण्यासाठी उतरले.

सध्या पाटाला पाणी सोडण्यात आल्यामुळे त्यांना पाटचारीतील पाण्याचा अंदाज न आल्याने किनपाराम बारेला याचा पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला त्याला वाचविण्याचा प्रयत्न करत असतांना त्याचा मोठा भाऊ काशिराम हा ही पाण्यात बुडाला.

वीज पडून दोघे जखमी-उनपदेव येथील मंदिरामागील देवसिंग पाड्यावर सोमवारी रात्री 12.40 वाजेच्या सुमारास शांताराम यशराम बारेला यांच्या झोपडीवर वीज कोसळली असता शांताराम बारेला (वय 28) आणि त्यांची पत्नी ऊंदीबाई उर्फ पुणेलीबाई शांताराम बारेला वय 24 हे दोघे वीजेने होरपळून भाजले गेले.

त्यांच्या वर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डाँ.विष्णूप्रसाद दायमा यांनी प्रथमोचार केले. सध्या त्यांच्यावर चोपडा उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

LEAVE A REPLY

*