पोलीस-ग्रामस्थांच्या वादामुळे कानळद्यात तणाव

0

जळगाव । दि. 9 । प्रतिनिधी-तालुक्यातील कानळदा गावी काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी थांबविल्याने पोलिस व ग्रामस्थांमध्ये वाद झाला. हा वाद चिघळल्याने पोलिस व ग्रामस्थांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली.

या घटनमुळे गावात गोंधळ निर्माण होवून तणाव निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत असून डीवायएसी सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांची समजूत घातली. त्यानंतर गावातील परिस्थिती नियंत्रणात आली.

याबाबत ग्रामस्थांकडून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कानळदा येथील प्रशांत शामकिरण सपकाळे या तरुणाचा ऑगस्ट महिन्यात गावाबाहेरील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

दरम्यान प्रशांतच्या छातीवर व शारिरावर जखमा असल्याने आजोबा रामचंद्र सपकाळे यांनी शेतजमीनीच्या वादातून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता.

रामचंद्र सपकाळे यांचा शेतीच्या वादातून जगन्नाथ सपकाळे व सुधीर सपकाळे यांच्याशी वाद सुरु होता. या वादातून दोघांनी नातू प्रशांत सपकाळे याला मारल्याचा संशय रामचंद सपकाळे यांनी व्यक्त केला होता.

दरम्यान नातवाच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळावा व संशयितांवर कारवाई व्हावी यासाठी रामचंद्र सपकाळे यांच्यासह गावातील 200 ते 300 ग्रामस्थांनी एकत्रित येवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात सुरवात केली.

मोर्चा थांबविल्याने झाला वाद
जळगाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी बंदोबस्ताकामासाठी वरखेडा येथे जात असतांनाच त्यांना मोर्चा दिसला त्यांनी मोर्चा थांबवून परवानगी बाबत विचारणा केली. दरम्यान मोर्चा विनापरवानगी असल्याने पोलिसांनी मोर्चा थांबवून ठेवला. यामुळे वादाला सुरवात झाली.

ग्रामस्थ व पोलिसांत बाचाबाची
मोर्चा थांबविल्यामुळे गावात पोलिस व ग्रामस्थांमध्ये चांगलाच वाद झाला. या वादातून पोलिस व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची होवून चांगलीच धक्काबुक्की देखील झाली. यामुळे गावात गोंधळ निर्माण होवून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप
मोर्चा थांबविल्यानंतरगोंधळ निर्माण होवून पोलिसांनी मारहाण करून डोके फोडल्याचा आरोप रामचंद्र सपकाळे यांनी केला. यातच त्यांचया कपाळाला चांगलीच दुखापत होवून रक्तबंबाळ अवस्थेत सपकाळे दिसून आले.

दरम्यान, सपकाळे पोलिस वाहनासमोर झोपून जात त्यांनी स्वतचे डोके फोडून घेतले. तर काही जणांकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.

पोलिस अधिकार्‍यांना केलेल्या धक्काबुक्कीत काहींचे किरकोळ कपडे देखील फाटले. मात्र, पोलिस उपअधीक्षक सांगळे व तालुका पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत घातल्यानंतर वाद निवळला.

यानंतर रामचंद्र सपकाळे यांना रूग्णालरात उपचारार्थ दाखल करण्रात आले. तर फिर्यांद दिल्यानंतर त्वरीत कारवाई करण्यात रेईल असे, सांगळे यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्यानंतर वाद मिटून वातावरण शांत झाले. या घटनेमुळे मात्र कानळदा येथे चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

अतिरिक्त पोलिसांची कुमक दाखल
घटनेची माहिती कळताच डीवायएसपी सचिन सांगळे यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान वाद वाढ असल्याने अतिरिक्त पोलिसांची कुमक दाखल करण्यात आली. त्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गावात पोलिस बंदोबस्त कायम होता.

 

 

LEAVE A REPLY

*