जळगाव तालुक्यात शिवसेनेचाच भगवा

0

जळगाव । दि.9। प्रतिनिधी-जळगाव तालुक्यात 11 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच भगवा फडकला असल्याने जळगाव तालुका हा शिवसेनेचाच बालेकिल्ला सिध्द झाला आहे.

जळगाव तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींसाठी आज निवडणुक प्रक्रिया पार पडली. तालुक्यात 10 ग्रामपंचायतींसाठी तहसिल कार्यालयाच्या आवारातील जिल्हा तलाठी संघाच्या सभागृहात निवडणूक निर्णयाधिकारी अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली.

आज झालेल्या मतमोजणीत शिवसेनेने सुरवातीपासुनच जोरदार मुसंडी मारली होती. जशी जशी मतमोजणी होत होती, तसतसा कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह आणि धाकधुकही दिसुन आली.

10 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 9 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच विराजमान होऊन शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकला आहे. तर वसंतवाडी येथे भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 80 पैकी तब्बल 65 सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत.

शिवसैनिकांचा जल्लोष
मतमोजणीचे निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी तहसिल कार्यालयाच्या आवाराबाहेर गुलालाची उधळण करीत विजयाचा जोरदार जल्लोष केला. शिवसेनेचे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, रावसाहेब पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नानाभाऊ सोनवणे यांनी शिवसैनिकांसमवेत फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

विजयी झालेले सरपंच (कंसात पराभूत उमेदवार)

विदगाव – प्रतिभा भगवान कोळी- 467 (सरीता लखीचंद कोळी),

घार्डी- लिलाधर नथु पाटील- 602(संगिता साहेबराव बाविस्कर),

किनोद- प्रियंका प्रविण सुर्यवंशी- 490(सुमा सुनिल चौधरी),

जळके- सुमनबाई वामन मोरे- (शोभा सुनिल ब्राम्हणे),

भोलाणे- विमलबाई रामकृष्ण कोळी- 607 ( लताबाई रामकिसन कोळी),

वसंतवाडी- वच्छला आधार पाटील-693( दुर्गाबाई भिला चव्हाण),

सुजदे- सुनंदा सुनिल सोनवणे-465(गणेश पंढरीनाथ सोनवणे),

कुवारखेडे- मंगलाबाई आधार सपकाळे (बिनविरोध),

वराड बु.- उखा किसन मोरे(बिनविरोध), निवडून आले असुन

भादली खु. येथे सरपंच पद नामनिर्देशन न आल्याने हे पद रिक्त राहणार आहे.

LEAVE A REPLY

*