स्थायी सभापतीपदी इंगळे, बालकल्याण सभापतीपदी कापसे बिनविरोध निवड निश्चित

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी खाविआच्या ज्योती इंगळे तर महिला बालकल्याण सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

उद्या दि.10 रोजी सकाळी 11 वाजता पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत होणार्‍या सभेत निवडीची घोषणा केली जाणार आहे.

स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांची वर्षभराची मुदत तर महिला बालकल्याण समितीची मुदत संपुष्टात आल्याने सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

स्थायी समिती सभापती पदासाठी खाविआच्या ज्योती इंगळे तर महिला बालकल्याण सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत होती. स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज असल्यामुळे ज्योती इंगळे आणि प्रतिभा कापसे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उद्या दि.10 रोजी सभापती निवडीची घोषणा केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*