वेल्डींग कारागीराची रेल्वेखाली आत्महत्या

0

जळगाव । दि. 9 । प्रतिनिधी-शहरातील बिबा पार्कमधील रहिवाशी असलेल्या वेल्डींग कारागीराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयताच्या खिश्यात सुसाईड नोट आढळून आल्याने आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत पोलिसांकडून व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, बिबा पार्कमधील रहिवाशी भानुदास बाबुराव पाटील वय 52 हे वेल्डिंग कारागीर होते.

दरम्यान त्यांनी आज सकाळी त्यांनी शिरसोली-जळगाव रेल्वे रुळावरील खांबा क्रमांक 417/25 जवळ धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी स्टेशन मास्टर यांनी दिलेल्या खबरीवरून रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ. संभाजी पाटील करीत आहे.

खिश्यात मिळून आली सुसाईड नोट
भानुदास पाटील यांनी मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहली होती. आत्महत्येनंतर त्यांच्या खिश्यात सुसाईड नोट आढळून आली. तसेच खिशातील कागदपत्रांवरून पाटील यांची ओळख पटण्यास पोलिसांना मदत झाली.

मी स्वत सुसाईड करीत असून कोणालाही जबाबदार धरु नये असा आशयाचा मजकूर सुसाईड नोट मध्ये लिहिलेला होता असे पोलिसांनी सांगितले.दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

 

LEAVE A REPLY

*