वर्सी महोत्सवातील सत्संग अन् भक्तिगीतांमध्ये भाविक तल्लीन

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-पूज्य अमर शहीद संत कंवरराम याचा 60 वा वर्सी, पूज्य संत हरदासराम यांच्या 40 तर संत बाबा गेलाराम यांच्या 9 वी वर्सी महोत्सवाला भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी सत्संग व भक्तीगित सादर करण्यात आले.

महोत्सवानिमित्त सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित भाविक तल्लीन झाले होते. उद्या दि. 10 रोजी सकाळी 11 वाजता झेंडापुजन होणार असून भोगसाहबला देशभरातून सुमारे 10 हजार भाविक उपस्थित राहणार आहे.

शहरात गेल्या 50 वषार्ंपासून सुरु असलेल्या सिंधी समाजाचे अमर शहीद संत कंवरराम साहब व संत बाबा हरदासराम साहब गोदडीवालेबाबा व संत बाबा गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी आज उल्हासनगर येथील संत बलराम गुरुजी यांचे आमगन झाले असून त्यांनी समाजातील संताच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

तसेच रात्री उशीरापर्यंत महोत्सवात विविध धार्मीक कार्यक्रम अमरावती येथील प. पू. सांई राजेशकुमार, लखनऊ येथील सांई चांडूराम साहेब, विलासपुर येथील बलरामसांई, देवीदासभाई यांच्यासह संत बाबा हरदासराम साहेब व संतबाबा गेलाराम साहेब ट्रस्टचे पदाधिकार्‍यांसह भाविक मोठया संख्येने उपस्थितीत मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडले. त्यामुळे संपूर्ण कंवरराम नगरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

अखंड साहब पाठाची समाप्ती
वर्सी महोत्सवाला संत बलरामदास गुरुजी, सांई राजेशकुमार, सांई चांडूराम साहेब, बलरामसांई, देवीदासभाई यांच्या उपस्थितीत गुरुग्रंथ साहब व धुनि साहबच्या अखंड पाठला दि. 8 रोजी प्रारंभ झाली. दरम्यान सुमारे अखंड पाठाची उद्या दि. 10 रोजी संतांच्या व भक्तांच्या उपस्थितीत सायंकाळी 6 वाजता समाप्ती होणार आहे.

सिंधी समाज बांधवांची आज दुकाने बंद
वर्सी महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच दि.10 रोजी गुरुग्रंथ साहब व धुनिसाहबच्या अखंड पाठाची समाप्ती होणार आहे. तसेच यावेळी समाजबांधवांसाठी भोग साहेबचे आयोजन करण्यात आले आहे. या भोगसाहब कार्यक्रमासाठी सिंधी समाजबांधव आपआपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून भोगसाहेबाला उपस्थित राहणार आहेत.

भक्तीगीतांतून संतांच्या जीवनकार्यावर प्रकाश
महोत्सवात विजय वधवा म्युझिक पार्टी, सांई राजेशलाल अमरावती राम-श्याम म्युझिक पार्टी यांनी महोत्सवात संत बाबा हरदासराम, संत बाबा गेलाराम यांच्या जीवन कार्यात भक्तीगीतांमधून तर बाबल प्यारो, जलगांव वारो व गौरव नाथानी, रिद्धी-सिद्धी ग्रुपतर्फे संतांच्या उपदेशावर आधारीत नाटकांचे सादरीकरण करुन त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

 

LEAVE A REPLY

*