फॅन्सी पणत्यांसह कलात्मक दिवे, माळांची क्रेझ

0

जळगाव । दि.9 । प्रतिनिधी-दिपोत्सव अवघ्या सहा दिवसांवर येवून ठेपला आहे. दिपोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी महिला वर्गाची लगबग सुरु झाली आहे. दरम्यान पारंपारिक पणत्यांसह महिलावर्गाकडून रंगेबीरंगी पणती, दिव्यांसह लोंबकळणार्‍या दिव्यांना अधिक पसंती देत असून त्यांची खरेदी केली जात आहे.

दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. सर्व सणांमध्ये महत्वाचा सण असलेला दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळीच्या दिवसात साजरा होणार प्रकाशपर्व अर्थातच दिपोत्सव साजरा करण्यासाठी बाजारपेठेत पारंपारिक पणत्यांसह राजस्थानी रंगेबीरंगी पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहे.

या पारंपारिक पणत्यांपेक्षा विविध राजस्थानी रंगेबीरंगी विविध आकारांच्या पणत्या, दिवे यासह दिवे लावण्यासाठी आकर्षक मातीच्या झुंबर देखील बाजारात विक्रीसाठी आले आहे.

तसेच गेल्या 8 ते 10 दिवसांपासून राजस्थानी पणती विक्रेत्यांनी शहरातील मुख्यबाजारपेठसह, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, आकाशवाणी चौक, प्रभात चौकांसह विविध ठिकाणी त्यांनी दुकाने थाटण्यात आली आहे.

तसेच दिपोत्सव साजरा करण्यासाठी महिलांकडून देखील पणत्या, दिवे यांसह शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जात आहे. तसेच महिलांकडून दरवर्षी नवीन आकराच्या व विविध प्रकाराचे दिव्यांची मागणी होत असते.

तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोणत्याही प्रकारची भाववाढ झाली नसल्याची माहिती शहरातील राजस्थानी पणती विक्रेते आनंद प्रजापती यांनी दिली.

या वस्तूंना अधिक मागणी
दिपोत्सव साजरा करण्यासाठी महिलांकडून पारंपारिक पणत्यांसह राजस्थानी रंगेबीरंगी रंगाच्या पणत्यांची खरेदी केली जात असते. यामध्ये गोल, चौकणी, हृदयाच्या आकराच्या पणत्यां तसेच दोन, तीन, पाच व दहा दिवे असलेल्या मोठ्या आकराच्या दिवे व कलाकूसरीचे कोरीव काम केलेल्या लहान मोठ्या आकाराच्या पणत्यांना महिलांकडून अधिक मागणी होत असून त्याची विक्री 20 ते 40 रुपये डझन, तसेच मोठ्या आकाराचे दिवे 20 ते 100 रुपये नग प्रमाणे त्याची विक्री होत असून महिलांकडून या वस्तूंची खरेदी केली जात आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिव्यांचे विशेष आकर्षण
दिवाळीत पाच दिवसांचा दिपोत्सव साजरा केल्यानंतर लक्ष्मीपुजनाला मातीपासून बनविलेल्या मोठ्या आकराचा दिवा लावून पूजा केली जात असते. परंतू गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक दिव्यांची जागा ही राजस्थानी लाल मातीच्या वेगवेगळ्या आकराच्या पणत्या विविध रंगाच्या आकर्षक कलाकुसर केलेल्या दिव्यांनी घेतली आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजपनाला देखील पारंपारिक दिव्यांची मागणी कमी होवून राजस्थानातील लाल मातीपासून बनविलेल्या रंगेबीरंगी मोठ्यज्ञा आकाराच्या दिव्यांनी घेतली असून या दिव्यांचे विशेष आकर्षण ठरले आहे.

 

LEAVE A REPLY

*