पारंपरिक पणत्यांनी लखलखणार दीपोत्सव

0
जळगाव |  प्रतिनिधी  :  सर्व सणांमध्ये महत्वाचा सण असलेला दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दिपोत्सव साजरा करण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारच्या पणत्यांपेक्षा पारंपारिक पणत्यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. त्यामुळे यंदा देखील पारंपारिक पणत्यांच्या लखलखाटाने दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

दिवाळीत पाच दिवसांचा दिपोत्सव हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. दरम्यान या दिपोत्सवात घरोघरी सायंकाळी दिवे लावून सर्वत्र लखलखाट करुन प्रकाश पर्वाचे स्वागत केले जाते. या सणासाठी लागणारे दिवे, पणत्या व बोळखे तयार करण्याचे काम कारागीरांकडून पूर्णत्सवास आले आहे.

लक्ष्मीपुजनाला मातीपासून बनविलेले बोळके व नवीन पणत्या लावून पुजा केली जात असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून चिनी मातीच्या वेगवेगळ्या आकराच्या पणत्या बाजारात विक्री होत असल्याने पारंपारिक पणत्यांची मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस पारंपारिक पणत्यांची व बोळक्यांची मागणी ही कमी होत असून दिवसभरात केळव ३०० ते ३५० पणत्या व बोळके तयार करीत असून १५ ते २० रुपये डझन प्रमाणे त्याची विक्री केली जात असल्याची माहिती शहरातील पणती व्यवसायीक ओंकार हिवरकर यांनी दिली.

विक्रेत्यांनी थाटली दुकाने

दिपोत्सवाला अवघे सातच दिवस शिल्लक राहील असून नागरीकांकडून दिेवाळीची खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान दिपोत्सवासाठी लागणारे दिवे व बोळके विक्रीची दुकाने शहरातील मुख्यबाजारपेठेसह रस्त्यांवर थाटली असून नागरीकांकडून त्याची खरेदी केली जात आहे.

पूजेसाठी बोळक्यांना अधिक महत्व

लक्ष्मीपुजनाला पाच बोळके आणि मोठ्या आकाराच्या दिव्यांना अधिक महत्व असते. त्यामुळे शहरतील कुंभारांकडून दिवे व बोळके तयार करण्याचे काम पुर्ण करुन अंतिम टप्प्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*