देवरी साहबच्या पंचामृताने सिंधी बांधवांच्या वर्सी महोत्सवाला प्रारंभ

0

जळगाव |  प्रतिनिधी :  सिंधी समाजाचे अमर शहीद संत कंवरराम साहब व संत बाबा हरदासराम साहब गोदडीवालेबाबा व संत बाबा गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सवाला पहाटे ५ वाजता देवरी साहबच्या पंचामृताने मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. यानंतर गुरुग्रंथ साहब व धुनी साहबच्या अखंड पाठाला सुरुवात करण्यात आली. तीन दिवसांच्यावर्सी महोत्सवाला सुरुवात झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

शहीद संत कंवरराम ट्रस्ट व कंवरनगर पूज्य सिंधी पंचायततर्फे चार दिवसीय वर्सी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम यांच्या मुर्तीला आज पहाटे देवरी साहब पंचामृताने स्नान करुन करण्यात आली.

यानंतर महोत्सवात आलेल्या १२ जोडप्यांच्याहस्ते धुळे येथील आर्य समाजातील महिलेनी संस्कृत भाषेतील मंत्रोपचाराने होमहवन व शांतीयज्ञ करुन सर्वत्र शांतता राहवी यासाठी सिंधी समाजबांधवांतर्फे प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी अमरावती येथील प. पू. सांई राजेशकुमार, लखनऊ येथील सांई चांडूराम साहेब, विलासपुर येथील बलरामसांई, देवीदासभाई यांच्यासह संत बाबा हरदासराम साहेब व संतबाबा गेलाराम साहेब ट्रस्टचे पदाधिकार्‍यांसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

तसेच महोत्सवात दिवसभर विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने भाविकांची रात्री उशीरापर्यंत दर्शन घेण्यासाठी रिघ लागली होती.

विद्युत रोषणाईचे विशेष आकर्षण

वर्सी महोत्सावानिमीत्त संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम यांच्या समाधी स्थळाला व परिसरात भव्य मंडप टाकून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सिंधी कॉलनीला यात्रेचे स्वरुप

वर्सी महोत्सवानिमित्त खाद्यपदार्थ विक्रीसह वेगवेगळे दुकाने थाटण्यात आले आहे. तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणे व उंच आकाशझोके देखील असल्याने परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

देशभरातील भाविक दाखल

सिंधी बांधवांतर्फे वर्सी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. महोत्सवासाठी लखनऊ, फैजाबाद, छत्तीसगढ, रायपूर, कटणी, टिबा, जबलपूर, नागरपूर, कोलकत्ता, बनारस यांच्यासह देशभरातील भाविक वर्सी महोत्सवासाठी जळगावात आले असून सिंधी पंचायततर्फे रेल्वे स्थानकावर आलेल्या भाविकांचे स्वागत करतांना पदाधिकारी दिसून येत होते.

अखंड साहब पाठण

वर्सी महोत्सवात सायंकाळी ६ वाजता भक्तीमय वातावरणात सांई राजेशकुमार, सांई चांडूराम साहेब, बलरामसांई, देवीदासभाई यांच्या उपस्थितीत गुरुग्रंथ साहब व धुनि साहबच्या अखंड पाठला आरंभ करण्यात आला. त्यानंतर संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम यांनी समाजासाठी केलेले कार्य समाजातील प्रत्येकांपर्यंत पोहचावा यासाठी बाल कलकारांनी नाटीका सादर करुन त्यांच्या जीवनकार्यवर प्रकाश टाकला. यावेळी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

झेंडा पुजनसह आज सांस्कृतीक कार्यक्रम

वर्सी महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच दि.९ रोजी सकाळी ११ वाजता संतांच्या उपस्थितीत झेडा पुजन करण्यात येणार आहे. त्यानंतर उल्हानरातील विजय वाधवा यांच्या भक्तीगीतांचा कार्यक्रम, सांई बलरामदास याचे अध्यात्किम प्रवचन, सांई राजेशलाल अमरावती यांचा भक्तीगीतांचा कार्यक्रम, त्यानंतर बाबल प्यारो जलगांव वारो हा तर गौरव नाथाणी यांच्या रिद्धी-सिद्धी ग्रुपच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*