मध्यप्रदेश, महाराष्ट्राला जोडणार्‍या रस्त्यासाठी ९९ कोटी मंजूर : आ. एकनाथरावच खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

0
जळगाव |  प्रतिनिधी  : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांना जोडणार्‍या भिकनगाव, पाल, खिरोदा, सावदा, अमोदा रस्ता या ४५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातुन ९९.१२ कोटी रूपये मंजुर झाले आहेत.

मध्यप्रदेशपासुन ते महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत रस्त्यांची परीस्थीती चांगली आहे. पण महाराष्ट्राच्या सीमेपासुन पुढे रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनिय झाली असुन वाहतुकीलाही मोठा अडसर निर्माण होत होता.

त्यामुळे हायब्रीड ऍन्युटी प्रकल्पांतर्गत भिकनगाव, पाल खिरोदा सावदा अमोदा रस्ता राष्ट्रीय महामार्ग या ४५ किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी मंत्री असतांना आ. एकनाथराव खडसे यांनी राज्य व केंद्रीय पातळीवर पाठपुरावा केल्यान ९९.१२ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला.

या रस्त्यामुळे चोपडा, रावेर मार्गे मध्यप्रदेशात वाहतुक करणे अधिक सोयीचे होणार आहे. सद्यस्थितीला या रस्त्यांसाठी काही ठिकाणी पुल बांधण्यांचे काम सुरू आहे. लवकरच पुढील कामांसाठी निवीदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*