102 ग्रा.पं.साठी 78.26 टक्के मतदान

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील 102 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आज किरकोळ वाद वगळता मतदान 78.26 टक्के शांततेत झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.

जिल्ह्यात 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे आज 102 ग्रामपंचायतीत मतदान झाले. एकूण मतदार 1 लाख 81 हजार 61 एवढे होते.

त्यापैकी 1 लाख 41 हजार 704 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 74 हजार 960 पुरुष तर 66 हजार 744 महिलांचा समावेश होता.

उद्या दि. 9 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. दरम्यान सरपंच निवड प्रथमच लोकनियुक्त होत असल्याने सर्वच ठिकाणी याबाबत उत्सुकता होती.

त्यामुळे उमेदवारांनी सर्वपरीने प्रयत्न केले. 11 ग्रा.पं.वर भाजपाचाझेडा – उदय वाघजिल्ह्यातील 18 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून त्यापैकी 11 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सर्व सदस्य भाजपाचे बिनविरोध निश्चित झाल्याचा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केला आहे.

यात रावेर तालुक्यात 3, बोदवड 2, जामनेर 1, जळगाव 1, अमळनेर 1, चाळीसगाव 2 व यावल येथे 1 असे सरपंच व ग्रा.पं. सदस्य बिनविरोध झाल्याचे उदय वाघ यांनी कळविले आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*