जलयुक्तच्या कामांना डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 565 कामांसाठी 58 कोटी 73 लाखाचा आराखडा तयार करण्यात आला होता.

365 कामांपैकी 437 कामे पूर्ण झाले असले तरी जि. प. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्यापही 120 कामांना सुरुवाात झालेली नाही. त्यामुळे जलयुक्तची कामे पुर्ण करण्यासाठी डिसेंबर पर्यत मुदतवाढ दिली आहे.

जलयुक्त शिवार योजना ही राज्यशासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत 2016-17 जि. प. प्रशासनाने 565 कामांसाठी 58 कोटी 73 लाखाचा आराखडा तयार केला आहे. यात 222 गावातील कामांचा समावेश आहे. परंतू अनेक गावांमध्ये अद्यापही कामांना सुरुवात केलेली नाही.

60 लाखाच्या कामांचे नियोजन
जलयुक्तच्या कामांबाबत वित्तीय वर्षासाठी आराखडा तयार करण्याचे काम जि. प. प्रशासनाने सुरु केले आहे. कृषी विभागाकडून अंतिम आराखडा मिळाल्यानंतर सिंचन विभागाच्या माध्यमातून 60 लाखाची कामे केली जाणार आहे.

आठ कामे रद्द ?
जलयुक्त शिवार योजनेतंर्गत लघूसिंचन विभागाने 45 कोटी 24 लाखाची 437 कामे पुर्ण केली आहे. त्यापैकी 25 कोटी 26 लाखाची बिले देखील अदा करण्यात आली आहे. परंतू 13 कोटी 4 लाखाची 120 कामे अद्यापही सुरु केलेली नाही. तसेच आठ कामे रद्द झाली असल्याचे देखील समजते.

LEAVE A REPLY

*