बामणोद येथे तरुण शेतकर्‍याची आत्महत्त्या

0

बामणोद, ता.यावल । दि.7 । वार्ताहर-येथील तरुण शेतकरी व्यंकट श्रीधर नेहेते यांनी शनिवारी सकाळी चार ते सहा वाजेदरम्यान आपल्या खळ्यात छताच्या लोखंडी एंगलला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे.

व्यंकट नेहेते सकाळी घरुन निघाल्यावर सरळ खळ्यात गेले. गुरांचे चारा पाणी करुन येतो तोपर्यंत आपले शेतात जाणारे मजूरदेखील चौकात त्यांची वाट पहात होते.

तेवढ्यात त्यांची पत्नी खळ्यात नेहमीप्रमाणे गेली तर पतीने गळफास घेतल्याचे दृश्य पाहून तिने हंबरडा फोडला. तेव्हा ग्रामस्थ जमले.

व्यंकट नेहते यांना आता पाच वर्षाची चिमुकली असून त्यांची पत्नी पाच महिन्यांची गरोदरदेखील आहे. तिच्यावर जणू आभाळच कोसळले आहे. आत्महत्त्येचे कारण समजू शकले नाही.

घटनास्थळी पोलीस पंचनामा करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, पो.कॉ.रमण सुरळकर करीत आहे.

 

LEAVE A REPLY

*