जळगावात आजपासून वर्सी महोत्सव

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-सिंधी समाजाचे अमर शहीद संत कंवरराम साहब व संत बाबा हरदासराम साहब गोदडीवालेबाबा व संत बाबा गेलाराम साहब यांचा वर्सी महोत्सव दि.8 ते 11 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

संत कंवरराम नगरात तयारी पूर्ण झाली असून मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षीही देशभरातील हजारो भाविक जळगावात दाखल होत आहेत.

शहीद संत कंवरराम ट्रस्ट व कंवरनगर पूज्य सिंधी पंचायततर्फे वर्सी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवासाठी संत कंवरराम साहब यांचे नातू संत मनोहरलाल साहब व त्यांचे पुत्र साई राजेशकुमार उपस्थित राहणार आहेत.

उद्या दि.8 पासून वर्सी महोत्सवाला सुरुवात होणार आहे. पहाटे 5 वाजता देवरी साहब यांना पंचामृत स्नान घालून महोत्सवास सुरवात होईल.

यानंतर संत कंवरराम, संत बाबा हरदासराम, बाबा गेलाराम यांची आरती होईल. यानंतर सकाळी 10 वाजता गुरूग्रंथ व धुनी साहेब यांच्या अखंड पाठाला सुरवात होईल. दि.9 रोजी सकाळी 11 वाजता झेंडा पुजन, दि.10 रोजी गुरूग्रंथ साहब व धुनी साहब यांचा अखंड भोग कार्यक्रम होईल. तर दि. 11 रोजी पल्लव साहबने वर्सी महोत्सवाची सांगता होईल.

देशभरातील भाविकांची हजेरी
सालाबादाप्रमाणे यावर्षीही वर्सी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. महोत्सवासाठी देशभरातील भाविक जळगावात येत आहेत. सिंधी पंचायततर्फे रेल्वे स्थानकावर आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात येत आहे.

सिंधी कॉलनीला यात्रेचे स्वरुप
वर्सी महोत्सवानिमित्त सिंधी कॉलनीत वेगवेगळे दुकाने थाटण्यात आले आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. त्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
सिंधी कॉलनीत 4 दिवस होणार्‍या वर्सी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वर्सी महोत्सवामुळे समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

 

LEAVE A REPLY

*