समलैंगिकता हा गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालय

0
नवी दिल्ली : भारतीय दंड संहितेतील ३७७ कलम वैध असून समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे समलैंगिक समुदायाला मोठा दिलासा मिळाला आहे. २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एकमेकांच्या सहमतीने ठेवण्यात  आलेले समलैंगिक संबंध गुन्हा ठरू शकत नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर आक्षेप घेत समलैंगिक संबंधास आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये अवैध ठरवले.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने २०१३ साली समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणारा निकाल दिला होता. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आयपीसी कलम ३७७ म्हणजे काय ?

आयपीसीच्या कलम ३७७ अन्वये दोन लोक एकमेकांच्या सहमतीने किंवा असहमतीने अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करतील तर समलैंगिकता हा गुन्हा ठरविण्यात येतो. या कलमानुसार गुन्ह्यातील आरोपींना १० वर्षापासून ते जन्मठेपपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद आहे. हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

LEAVE A REPLY

*