ज्योती इंगळे, प्रतिभा कापसे यांचे अर्ज दाखल

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी खाविआच्या ज्योती इंगळे तर महिला बाकल्याण सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे यांनी नगरसचिव अनिल वानखेडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.

मनपा स्थायी समिती सभापती व महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि.9 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

स्थायी समिती सभापती पदासाठी खान्देश विकास आघाडीतर्फे ज्योती इंगळे यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून सुनील पाटील, अनुमोदक म्हणून वर्षा खडके तर दुसर्‍या अर्जावर सूचक म्हणून अमर जैन तर अनुमोदक म्हणून ज्योती तायडे यांची स्वाक्षरी आहे.

महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रतिभा कापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सूचक म्हणून ममता कोल्हे तर अनुमोदक म्हणून पार्वता भिल यांची स्वाक्षरी आहे.

यावेळी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, वर्षा खडके, अमर जैन, राजू मोरे, अजय पाटील, सुनिल महाजन, सुनिल पाटील, सुरेश सोनवणे, ज्योती तायडे, ममता कोल्हे, शोभा बारी, पार्वता भिल आदी उपस्थित होते.

सभापती निवडीसाठी दि.10 रोजी पिठासिन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत विशेष सभा होणार आहे.

LEAVE A REPLY

*