मुद्रण कलेमुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल

0

जळगाव । दि.7 । प्रतिनिधी-आताच्याा बदलत्या युगात तंत्रज्ञाचा वेग वाढत चालला आहे. दिवसेंदिवस बदलत चाललेली मुद्रण कला संशोधनाचा भाग असून मानवी जीवनात अमूलाग्र बदल घडवित आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.

केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त मू.जे. महाविदयालय, महाराष्ट्र मुद्रण परिषद, स्पार्क इन्स्टीटयुट ऑफ मल्टिीमीडिया आणि प्रिंटींग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विदयमाने महाप्रिंट एक्स्पो या प्रदर्शनाच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सहसचिव किरण बेंडाळे, कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, राष्ट्रीय संस्था इपामाचे अध्यक्ष दयाकरन रेड्डी, बाळकृष्ण वाणी, समन्वयिका साधना थत्ते उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिका-यांचे हस्ते महाएक्सपोचे उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, बदलत्या युगात तंत्रज्ञानाचा वेग वाढला असून ग्रामीण भागातील नागरिक या तंत्रज्ञानाशी जुळला आहे.

यासाठी मुद्रण तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. दरम्यान, प्रास्ताविकात साधना थत्ते यांनी विदयार्थ्यांना व उदयोजकांना प्रिंटींग क्षेत्रातील त्यासठी लागणार्‍या मशिनरी, भांडवल यांची माहिती दिली.

त्यानंतर मुद्रण परिषदेच्या मुद्रा या विशेष अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य उपाध्यक्ष बाळकृष्ण वानी यांनी परिषदेची व अधिवेशनाची माहिती दिली.

इमामचे दयाकरन रेड्डी म्हणाले की, मुद्रण क्षेत्रात कामगारांची वाणवा भासत असून मुद्रण तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम शिकलेल्या विदयार्थ्यांना मोठया पगाराची नोकरी आज उपलब्ध आहे असे सांगत जगातल्या द्वितीय क्रमांकावर असलेल्या या क्षे़त्राकडे विदयार्थी व संशोधकांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब आंबेकर यांनी, राज्यात 2 हजार मुद्रक असल्याचे सांगत मुद्रकांच्या विविध प्रश्नावर व समस्यावर परिषद गांभीर्याने काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. सुत्र संचलन डॉ.भाग्यश्री भलवतकर तर आभार परिषदेचे कमलेश धारगलकर यांनी मानले.

 

 

LEAVE A REPLY

*