जीएसटीच्या बदलामुळे 15 दिवसआधीच दिवाळी – मोदी

0

द्वारका । दि.7 । वृत्तसंस्था-वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) रचनेत केंद्र सरकारकडून काल महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यामुळे देशात 15 दिवस आधीच दिवाळी आली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

ते शनिवारी गुजरातमधील जाहीर सभेत बोलत होते. जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचे आश्वासन आम्ही यापूर्वीच दिले होते.

जेणेकरून कायद्यातील त्रुटी दूर करता येतील. अखेर काल जीएसटी समितीने हे बदल करून सामान्यांना दिलासा दिला, असे मोदींनी सांगितले.

तसेच देशातील लोक सरकारच्या निर्णयांना पाठिंबा देत असल्याचा दावाही त्यांनी केला. जेव्हा लोकांचा सरकारवर विश्वास असतो आणि चांगल्या हेतूने एखादा निर्णय घेतला जातो, तेव्हा लोकांनी त्याला पाठिंबा देणे नैसर्गिक आहे.

सध्या देशातील सामान्य जनतेला विकासाचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचावा, असे वाटते. कोणालाही त्यांच्या मुलांनी गरीबीत आयुष्य काढावे, असे वाटत नाही.

त्यामुळे अशा लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना गरिबीशी लढा देण्यासाठी सरकार मदत करेल, असे आश्वासन मोदींनी दिले.

LEAVE A REPLY

*