उमविच्या पत्रकारीता विभागाच्या कॅम्पस टाईम्स व उमवि युवा प्रायोगीक अंकांचे प्रकाशन

0
जळगाव | प्रतिनिधी  :  एखाद्या घटनेची पूर्ण शहानिशा केल्यानंतरच दिलेली बातमी परिणामकारक ठरते. पत्रकारितेत नि:पक्षपातीपणाला विशेष महत्व असून पत्रकारितेच्या विद्याथ्र्यांनी आकर्षणाला बळी न पडता पत्रकारितेतील नौतिकता अंगिकारावी असे मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी. पी. पाटील यांनी व्यक्त केले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातील प्रथम वर्षाच्या विद्याथ्र्यांनी नुकताच प्रायोगिक स्वरूपात कॅम्पस टाईम्स व उमवि युवा या दोन वृत्तपत्रांचे संपादन केले.

पहिल्या गटाने संपादित केलेल्या कॅम्पस टाईम्स या प्रायोगिक वृत्तपत्राच्या प्रकाशन कुलगुरुंच्या हस्ते करण्यात आले. तर उमवि युवा या वृत्तपत्राचे प्रकाशन संशोधन आणि विकास मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. पी. पी. माहुलीकर यांच्याहस्ते विद्यापीठात करण्यात आले. यावेळी पर्यावरणशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.एस.टी. इंगळे, विभागप्रमुख डॉ.तुकाराम दौड, डॉ. सुधीर भटकर, डॉ.विनोद निताळे सह विद्यार्थी उपस्थित होते.

विद्याथ्र्यांशी संवाद साधतांना कुलगुरु म्हणाले घटना घडल्यानंतर पत्रकाराने तिच्या तळाशी जाऊन माहिती घेतली पाहिजे. आपल्या बातमीतून खरे वास्तव मांडले जात आहे का याचा सुध्दा विचार पत्रकाराने केला पाहीजे. तत्पुर्वी डॉ. सुधीर भटकर यांनी प्रायोगिक वृत्तपत्र निर्मिती मागील भूमिका विषद केली.

विद्याथ्र्यांच्या दुसज्या गटाने प्रकाशित केलेल्या उमवि युवा या वृत्तपत्राचे प्रकाशनप्रसंगी प्रा.डॉ. पी. पी. माहुलीकर यांनी विद्याथ्र्यांचा परिचय करून घेत त्यांच्याशी संवाद साधला.

कॅम्पस टाईम्स या पत्राच्या संपादकीय मंडळात नदिम शेख, अॅमी अँबिगेल, मिनल खौरनार, मोहिनी वानखेडे, कविता ठाकरे, मुकेश माळी, विजय पाटील, शुभम कोठावदे आणि निलेश वाणी यांचा समावेश होता.

तर उमवि युवा या पत्राचे संपादकीय मंडळात रूचिता चौधरी, विशाल धनगर, योगेश पाटील, गिरीश सोनवणे, साईनाथ इथापे, ताराचंद पाटील, दिपक सपकाळे, प्रणव सपकाळे, अक्षय महाजन, राहुल चव्हाण, विजय शिंदे, जितेंद्र नाईक, सिध्देश्वर लटपटे आणि प्रदिप मोतीराया यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

*